शॉपिंग हा महिलांच्या अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळायचा विषय असतो. दागिने, कपडे खरेदीला महिलांची नेहमीच पसंती असते. ज्वेलरी आणि कॉस्मेटिक खरेदीसाठीही महिलावर्ग स्वस्तातलं मार्केट शोधत असतो. पुण्यात अगदी 50 रुपयांपासून आकर्षक ज्वेलरी मिळणारं मार्केट आहे. रविवार पेठेतील रामसुख मार्केटमध्ये विविध प्रकारची ज्वेलरी आणि कॉस्मेटिक होलसेल दरात मिळते.