प्रत्येक शहराची वेगळी अशी खाद्य संस्कृती असते आणि काही ठिकाणं खवय्यांची आकर्षण केंद्रं असतात. पुण्याची खाद्य संस्कृतीही प्रसिद्ध आहे. येथील काही ठिकाणं ही खवय्यांना नेहमीच आकर्षित करतात. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात असणारी झटका भेळ हे असंच एक ठिकाण आहे. भारताच्या स्वातंत्र्य काळात म्हणजेच 1947 साली सुरू झालेली ही भेळ प्रसिद्ध आहे. सध्या तिसरी पिढी आपला वारसा जपतेय. अनेक कलाकारही या भेळचे चाहते असून इथे नेहमीच खवय्यांची गर्दी असते.