अनेकांच्या नाष्ट्याची सुरुवात ही पोह्यापासून होते. पोहे हा पचनास हलका आणि आरोग्यासाठी फायदेशीर असा पदार्थ आहे. पण पोह्यामध्ये वेगवेगळे प्रकार देखील आहेत ते कधी खाल्लेत का? पुण्यातील सदाशिव पेठ येथे असलेल्या पोह्याचा मामला या ठिकाणी चक्क 18 प्रकारचे पोहे मिळतात. हे पोहे खाण्यासाठी पुणेकरांची मोठी गर्दी पाहिला मिळते.