प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही विशेष कला गुण असतात. काहींच्यात जन्मजात असतात, काहींमध्ये वडिलोपार्जित जोपासलेले असतात तर काहींनी आवड म्हणून शिकलेले असतात. प्रत्येकाची कला ही वेगवेगळी असते. कुणी गायक होतं, कोण वादक होतं, संगीतकार होतं तर कोणी आपल्या कलेच्या जोरावर लक्षणीय कामगिरी करतं. अशीच कला जोपासत पुण्यातील विजय शिंदे आपल्यातील चित्रकला ही कला जोपासतायेत. त्यांनी चित्रीत केलेल्या पेंटिंगला परदेशातूनही मागणी आहे.