उपवासाला अनेक जण रताळी खातात. मात्र रताळे वर्षभर उपलब्ध नसते. त्यामुळे रताळ्याच्या वड्या बनवून स्टोअर करून ठेवता येतात. विशेष म्हणजे वड्या बनविण्यासाठी केवळ रताळी लागतात. त्यात तिखट मिठाचीही गरज नसते. तर या वड्या नेमक्या कशा करतात? याबाबत वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी माहिती दिली आहे.