Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात मोठी बातमी, अटकपूर्व जामीन मिळणार? | Marathi Newsवादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे. तसेच यूपीएससीने पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीमधून काढून टाकले आहे. पूजा खेडकर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं आणि त्यामध्ये त्या दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांना यूपीएससीकडून दोषीकरार देण्यात आला आहे. नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार दोषी ठरवण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांच्या बाजूने आज कोर्टात युक्तिवाद करण्यात आला होता की, अजून यूपीएससीने दोषी ठरवलेले नाही. यूपीएससीकडून आज दुपारपर्यंत तिचं म्हणणं मांडायला वेळ देण्यात आला होता. अखेर यूपीएससीने पूजा खेडकर यांच्यावर कडक कारवाई केली आहे.