महाराष्ट्र पोलीस होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. लवकरच राज्यात पोलीस भरती होत आहे. त्यासाठी लाखो तरुणांनी तयारी सुरू केलीय. पोलीस भरतीमध्ये मैदान चाचणीनंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा लेखी परीक्षेचा असतो. अनेक वेळा विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे लेखी परीक्षेचा अभ्यास नेमका कसा करावा? असा अनेकांना प्रश्न असतो. याबाबत सविस्तर माहिती छत्रपती संभाजीनगर येथील मार्गदर्शक प्रा. जायभाये यांनी सांगितली आहे.