महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदं भरण्यासाठी घेतली जाणारी मैदानी चाचणी परीक्षा 19 जूनपासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलात विविध 17 हजार रिक्त पदासांठी भरती होत आहे. 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. यासाठी राज्यभर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. सोलापूर शहर पोलीस दलातील 34 पोलीस शिपाई आणि 16 चालक पोलीस शिपाई अशा एकूण 50 रिक्त पदांसाठी 19 जूनपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर इथं पोलीस शिपाई पदासाठी 1540 आणि चालक पोलीस शिपाई पदासाठी 834 असे एकूण 2374 आवेदन अर्ज प्राप्त झाले आहेत.