पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातल्या सर्व तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 17 हजार रिक्त पदं भरण्यासाठी 19 जूनपासून संपूर्ण राज्यभरात मैदानी चाचणी परीक्षा सुरू होणार आहे. या 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज दाखल झाले आहेत. जालना जिल्ह्यात 125 पदांसाठी 19 जून रोजी भरती प्रक्रिया पार पडेल. यातून 102 पोलीस शिपाई पदं आणि 23 चालक पोलीस शिपाई पदं भरण्यात येतील. भरती प्रक्रियेसाठी येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र सोबत घेऊन यावं, असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी कोणकोणती कागदपत्र आणावी, पाहूया.