आपल्यापैकी अनेक तरुण-तरुणींचं पोलीस बनायचं स्वप्न असतं. आता लवकरच महाराष्ट्र शासनाकडून पोलीस भरती घेण्यात येणार आहे. त्यासाठी अनेकजण तयारी करत आहेत. पोलीस भरतीत शारीरिक चाचणी हा महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे यामध्ये चांगले गुण घेण्याचा सर्वांचाच प्रयत्न असतो. त्यासाठी शारीरिक चाचणीची तयारी आणि योग्य आहार गरजेचा असतो. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील प्रशिक्षक समाधान लोंढे यांनी माहिती दिलीय.