मुंबईतील अनेक पेट्रोल पंपावर लोक गर्दी करतायत. याबाबत मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना ट्वीट करत एक आवाहन केलंय. पेट्रोल पंपांवर गर्दी करू नका आणि घाबरून इंधन खरेदी करू नका अशी विनंती मुंबई पोलिसांनी केलीय. अफवांवर विश्वास ठेवू नका. मुंबईत पुरेसा इंधन साठा उपलब्ध असून मुंबईत पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या टँकरना आम्ही पुरेशी सुरक्षा पुरवत आहोत. असंही मुंबई पोलिसांनी सांगितलंय.