आपण अनेक वेळा ऐकतो की अनेक महाविद्यालयांमध्ये सीनियर विद्यार्थ्यांकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग होते आणि याचा वाईट परिणाम हा विद्यार्थ्यांवर होतो. त्यामुळे हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय दंत महाविद्यालयात एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘बडी’ असे या नवीन उपक्रमाचे नाव आहे. हा उपक्रम नेमका काय आहे, विद्यार्थ्यांना याचा कसा फायदा होणार होणार, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर माया इंदुरकर यांच्याशी संवाद साधला.