नाशिकच्या इगतपुरी परिसरात असलेल्या धारवाडीतील पाण्याचं दुर्भिक्ष न्यूज 18 लोकमतनं दाखवलं, हंडाभर पाण्यासाठी एका गरोदर महिलेला करावी लागणारी जीवघेणी कसरत न्यूज 18 लोकमतनं बातमीतून समोर आणली. ही बातमी बघितल्यानंतर वेल्स ऑन व्हील्स या सामाजिक संस्थेनं पुढाकार घेत या गरोदर महिलेसह या भागातील 100 कुटुंबांना 45 लिटरचे 100 वॉटर व्हील्स ड्रम देण्याचा निर्णय घेतलाय, या वॉटर विल्स ड्रममुळे या महिलांच्या डोक्यावरील हंडा जमिनीवर येणार आहे. आणि पाण्यासाठी चार ते पाच खेपा मारण्याऐवजी एकाच खेपेत 45 लिटर पाणी त्यांना मिळणार आहे. घरातील लहान मुलंही हा ड्रम सहजरीत्या आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात. ऐन दुष्काळाच्या छायेत असलेल्या या महिलांना मोठा फायदा या संस्थेच्या पुढाकाराने आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीनं मिळतोय.