गुंतवणूक करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे मार्ग हे अवलंबले जातात. यामध्ये सोने खरेदी, म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दिली जाते. परंतु शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना अनेक वेळा मनात धाक धुक असते. म्हणजे कमी कालावधीत सर्वांना जास्त आणि लवकर पैसे हे हवे असतात. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. परंतु हेच पैसे गुंतवताना काय काळजी घ्यावी याबद्दलच पुण्यातील एनआयएसएम सर्टिफाईड डेरीवेटिव्ह एनलिस्ट डॉ. गणेश जाधव यांनी माहिती दिली आहे.