देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक नॅशनल इलिजिबिलिटी कम एंन्टर्स टेस्ट (नीट) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नागपूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच ऑल इंडिया पहिली रॅक प्राप्त केली आहे. वेद शेंडे आणि क्रिष्णमूर्ती शिवान या विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 गुण प्राप्त करून नागपूरचे नाव देशपातळीवर पोहोचविले आहे.