Narendra Modi Congratulates Indian Team : विश्वचषक कायम स्मरणात राहिल - मोदी | Marathi News भारतीय संघाने टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत केले आहे. भारताच्या या विजायाचा देशभरात जल्लोष करण्यात येत आहे. देशाच्या सर्वच भागांत आतषबाजी करून टीम इंडियाच्या कामगिरीचे स्वागत केले जात आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या या नेत्रदीपक कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील अभिनंदन केले आहे. त्यांनी टीम इंडियाच्या अभिनंदनासाठी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर शुभेच्छा संदेश देणारा खास संदेश प्रसिद्ध केला आहे.