श्री क्षेत्र सोनारी हे काळभैरवनाथाचे देवस्थान देशभरात प्रसिद्ध आहे. अनेकांचे कुलदैवत असलेल्या धाराशिवमधील श्रीक्षेत्र काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. याच सोनारी गावात दोन ते अडीच हजार माकडे आहेत. याठिकाणी आठ दिवसांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली. पिलाला जन्म दिल्यानंतर काही वेळातच आईचा मृत्यू झाला. तशा अवस्थेत माकडाचं पिलू आईला बिलगत होतं. हे पाहून सचिन सोनारीकर यांनी त्या पिलाला घरी आणले आणि आता ते त्याचा सांभाळ करत आहेत. आतापर्यंत त्यांनी संकटातील माकडांचा आधार बनण्याचं काम केल्यानं त्यांचं कौतुक होतंय.