मोदक हा महाराष्ट्रात व भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात आणि त्याशिवाय त्यांचा नैवेद्य अपूर्णच मानला जातो. मोदक दिसायला जितके सुंदर तितकेच चवीष्ट ही असतात. मोदक बनविण्याचे अनेक प्रकार आहेत. नेहमीच्या मोदकांपेक्षा वेगळी अनोखी आणि चविष्ट रेसिपी म्हणजे पान गुलकंद मोदक होय. हेच पान गुलकंद मोदक कसे बनवायचे? याची रेसिपी मुंबईतील माधुरी आंबुरे यांनी सांगितली आहे.