माणसाच्या मानसिक आरोग्याच्या अनेक अवस्था आहेत. आपल्या आजूबाजूला अनेकजण वेगवेगळ्या मानसिक गुंत्यातून चाललेले आहेत. मानसिक आरोग्य विषयीच्या नैराश्य आणि मॅनिया या धोकादायक अवस्था मानल्या जातात. याबाबत अनेकांना माहिती नसते. याबद्दलच पुणे येथील मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक नेत्रा खरे यांच्याकडून जाणून घेऊ.