Maval News : मावळमध्ये चौराई मंदिर परिसरात चोरी, व्हिडीओ CCTV मध्ये कैद | Marathi News- मावळमधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या चौराई डोंगरावरील चौराई मंदिराच्या समोरील असलेली चांदीसदृश्य सिंहाच्या मूर्तीची चोरी झाल्याची घटना घडलीये... चोराने भर दिवसा ही मूर्ती लंपास केल्याने एकच खळबळ उडालीये.. या चोराने सुरुवातीला मंदिरातील कासवाची मूर्ती चोरण्याचा प्रयत्न केला..मात्र हा चोरीचा प्रयत्न फसला... त्यानंतर चोरट्याने चक्क मंदिर परिसरातील सिंहाची मूर्ती लंपास केली... यासाठी त्यान चक्क लोखंडी रॉडचा प्रयत्न केला.. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.. दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून चोरट्याला शोधणाऱ्याला मंदिर प्रशासनाकडून बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.