मराठवाडा हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. मराठवाड्यात सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे. खरंतर एक दुष्काळ पडला की तो पचवायला शेतकऱ्यांना दोन वर्षांचे उत्पन्न द्यावं लागतं, असं म्हटलं जातं. धाराशिव जिल्ह्यातलं सर्वात मोठं धरण म्हणजे सीना कोळेगावचं धरण आहे. याच धरण परिसरात उसाच्या पिकावर नांगर फिरवला जातोय. याला कारण म्हणजे दुष्काळाची दाहकता होय.