‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ असे म्हणत मराठीचा अभिमान बाळगणारे केवळ महाराष्ट्रातच आहेत असं नाही. भारताबाहेर अगदी मॉरिशसमध्ये मराठी भाषेचा मानसन्मान वाढवण्याचा आणि प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्र आणि मराठी भाषिक संघ गेली कित्येक वर्षे करत आला आहे. याच मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राच्यावतीने मॉरिशस मधल्या काही कलाकारांना महाराष्ट्र दर्शन घडवले. ‘देशभक्तीचा दिवा’ या मराठी नाटकाचे निशुल्क प्रयोग सादर करत या कलाकारांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भेटी दिल्या आहेत.