Manu Bhakar Father Reaction : मुलीच्या यशावर काय म्हणाले वडील, मनू भाकरच्या वडिलांची प्रतिक्रिया...पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. महत्त्वाचं म्हणजे अवघ्या पॉईंट एकनं मनूचं रौप्य पदक हुकलंय. कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होतं, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं, असं मनू भाकरने कांस्य पदक जिंकल्यानंतर सांगितलं. मनूच्या या यशानंतर तिच्या हरयाणा इथल्या झज्जर गावी एकच जल्लोष साजरा करण्यात आलाय. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.