फळांचा राजा म्हणजेच आंबा. आंबा हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि स्वादिष्ट फळांपैकी एक आहे. कृत्रिमरित्या आंबा पिकविण्यासाठी रसायनांचा वापर होत असल्याच्या बातम्या अनेक वेळा तुम्ही वाचल्या असतील. शेवटी कृत्रिमरीत्या आणि नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा कसा ओळखायचा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे कृत्रिमरीत्या आणि नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा कसा ओळखायचा याबद्दच पुण्यातील आंबा विक्रेते मंदार खेडेकर यांनी माहिती दिली आहे.