उन्हाळ्यात कैरी सहज उपलब्ध असते. त्यामुळे या काळात आंबा किंवा कच्चा कैरीचे विविध पदार्थ घरोघरी बनवले जातात. अनेकजण कच्ची कैरी आणि पुदिन्याच्या पानांची चटणी बनवतात. 2 मिनिटांत तयार होणारी ही झटपट रेसिपी जेवणाची चव वाढवते. पुदिन्याची पाने ही थंडावा देणारी मानली जातात. त्यामुळे उन्हाळ्यात ही आंबा पुदिना चटणी बनवायची कशी? हे वर्धा येथील गृहिणी स्नेहल मुळे यांनी दाखवले आहे.