एखाद्या महिलेने जर ठरवले तर ती काहीही साध्य काही करु शकते. हेच वर्ध्यातील वैशाली पाटील यांनी दाखवून दिलं आहे. 2007 मध्ये त्यांनी गृह उद्योग सुरू केला. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत दर्शना महिला बचत गटाची सुरुवात केली. वैशाली यांनी महिलांना गटाच्या माध्यमातून आपण आपल्या पायावर कसं उभं राहू शकतो यासंदर्भात जागृत केलं. नमकीन आणि मिठाई अशा प्रकारचे अनेक पदार्थ बनवून विक्री होऊ लागले परंतु लॉकडाऊन पासून व्यवसाय ठप्प पडला. मात्र वैशाली यांच्या हातच्या लंबी रोटी बनवण्याच्या कलेने परिस्थिती रुळावर आली. इतकंच नाही तर आता जिल्ह्यातच नाही तर बाहेर जिल्ह्यात देखील लंबी रोटीला पसंती मिळाल्याने दुकाने स्थापन करण्यात आली. यातून 260 महिलांना रोजगार प्राप्त झालाय.