भगवान शिवाला प्रसन्न करणे सर्वात सोपे असल्याचे धर्म शास्त्रांमध्ये सांगितले आहे. महादेव आपल्या भक्तांवर सहज प्रसन्न होतात म्हणून त्यांना भोलेनाथ म्हणतात. भगवान शंकर शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने लगेच प्रसन्न होतात, असे मानले जाते. महादेवाच्या पूजेचे आणि जलाभिषेकाचे काही नियम धर्मशास्त्रात सांगितले आहेत. महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करताना काही धार्मिक विधी आणि नियमांचे पालन करावे लागते. याबाबत वर्धा येथील पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे यांनी माहिती दिली आहे.