महाबळेश्वर येथे असलेल्या विशाल अगरवाल यांच्या MPG क्लब या हाॅटेलवर अखेर सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं बुल्डोजर फिरवण्यात आला सुमारे ४४ पेक्षा जास्त रुम्स ला सील केल्या होत्या यातल्या ८ अनाधिकृत रुम्स तात्काळ पाडण्यात आल्या आहेत हाॅटेल ची लाईट आणि पाण्याचं कनेक्शन सुद्धा केलं कट करण्यात आलय . शासकीय भाडेपट्ट्यात रहिवास वापरा करिता मिळालेली जागेत हे हाॅटेल उभारलं होतं यामुळं ही कारवाई करण्यात आलीये महाबळेश्वर नगरपालिका सातारा जिल्हा महसुल यंत्रणा या कारवाईत सहभागी झाल्या होत्या या कारवाईच्या निमित्तानं विशाल अगरवाल याला सातारा जिल्हा प्रशासनाचा मोठा दणका दिलाय सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानं कारवाई ही कारवाई करण्यात आली असुन महाबळेश्वर मधील नागरीक तसेच तक्रारदार अभय हवालदार यांनी याबाबत समा्अन व्यक्त केलय या ठिकाणचा आढावा घेवुन तक्रारदार अभय हवालदार यांच्या सोबत बातचित केलीये आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी