माढा लोकसभा मतदारसंघात दररोज नवनवीन घटना घडल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या दोन मतदार संघाकडे लागले आहे या दोन मतदार संघात तरुण वर्ग व महिला वर्गाचे मतदान अधिक असल्याने हे मतदान टर्निंग पॉईंट ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. माढा लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे या दोन मतदार संघात दररोज नवनवीन घटना घडत असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या दोन मतदार संघाकडे लागले आहे उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रामदास आठवले प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी सभा घेतल्या