आजकालच्या बदलत्या जीवनमानानुसार शारीरिक व्याधी देखील वाढत आहेत. त्यातच बऱ्याच जणांना तरुण वयातच भेडसावणारी समस्या म्हणजे वाढणारे बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी. बेली फॅटने त्रस्त असलेले कित्येक जण विविध पर्याय अवलंबून आपले शरीर सुडौल बनवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र वाढलेले पोट कमी करण्यासाठी डायटिंग आणि किमान थोडाफार व्यायाम गरजेचा आहे. त्यामुळेच पोट कमी करण्यासाठीच्या काही टिप्स आणि सोप्या घरच्या घरी करता येणाऱ्या व्यायामाबाबत कोल्हापूरच्या फिटनेस ट्रेनरने माहिती दिली आहे.