19 एप्रिल रोजी देशात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. यावेळी 21 राज्यांमधील 102 जागांसाठी नागरिकांनी मतदान केलं. यात जवळपास 1,625 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यातून आपला नेता निवडण्यासाठी सामान्य नागरिकांनी मतदानाचा अधिकार जातीनं बजावायला हवाच. पुण्यात कार्यरत असलेल्या अनु यांना खरोखर मानलं पाहिजे.