सकाळी सर्वात आधी चहा हवा, तरच पुढचं काम सुचतं असं अनेकजणांचं असतं. म्हणजेच बहुतेकजणांच्या दिवसाची सुरूवातच चहानं होते. त्यामुळे चहाचा व्यवसाय हा लहान असो किंवा मोठा असो, त्यातून नफा मात्र बक्कळ मिळतो. हाच विचार करून अनेकजण या व्यवसायात नशीब आजमवता. कष्ट करण्याची तयारी असेल तर नक्की फायदा होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद हुंबे.