छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अगदी मोफत प्लॅस्टिक सर्जरी होणार आहे. इथल्या असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर उज्वला दहिफळे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, या रुग्णालयाचे डीन डॉ. शिवाजी सुक्रे आणि सुपर स्पेशलिटी बिल्डिंगचे इन्चार्ज डॉ. सुधीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग सुरू करण्यात आलाय. इथं कोणालाच प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठी 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. अगदी मोफत प्लॅस्टिक सर्जरी करता येईल.