राज्यभरात सध्या पोलीस दलातील भरती प्रक्रियेसाठी इच्छूक उमेदवारांची लगबग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा पोलीस दलाकडून पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी भरती प्रक्रियेचं नियोजन करण्यात आलंय. येत्या 19 जूनपासून 27 जूनपर्यंत मैदानी चाचणी पार पडणार आहे आणि भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी उत्तम नियोजन केल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.