कोल्हापुरी स्पेशल नॉनव्हेज पदार्थ पाहताक्षणी नॉनव्हेज प्रेमी त्याची चव चाखण्यासाठी आतुर होत असतात. कोल्हापूरच्या बाहेर राहणाऱ्या कित्येक नॉनव्हेज प्रेमींच्या बाबतीत तर कोल्हापुरी स्पेशल चिकन-मटण हे नेहमी अग्रक्रमी असते. पण हे चविष्ट पदार्थ तितकेच चविष्ट बनवताना बऱ्याचजणांना त्याची पाककृती माहीत नसते. त्यामुळे कोल्हापुरातील हॉटेल रेडवूडचे मालक आणि एक अनुभवी शेफ असलेल्या जितेंद्र करंबे यांनी स्पेशल कोल्हापुरी चिकन आणि तांबडा-पांढरा रस्सा यांची पाककृती सांगितली आहे.