देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. एकीकडे कित्येक गोष्टींमध्ये देश आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव गाजवत आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील काही दुर्गम भागात अजूनही नागरीक मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. अशाच प्रकारे आजवर दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नसणाऱ्या कोल्हापूरच्या एका गावात स्वातंत्र्यानंतर पहील्यांदाच लालपरीचे आगमन झाले आहे. गावातील लहानांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनी यासाठी आनंद व्यक्त केला आहे.