आज ५ ऑगस्ट आहे. बरोबर चार वर्षांपूर्वी, २०२० साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमीपूजन पार पडलं... राम मंदिर हा देशभरातल्या लाखो हिंदूंच्या आस्थेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय. पाचशे वर्षांच्या लढ्यानंतर राम मंदिराचा पाया रचला जाण्याचा क्षण अद्भुत होता, अविस्मरणीय होता. पायाभरणी झाल्यापासून चार वर्षांनी, २२ जानेवारीला अयोध्यापती प्रभू श्रीराम त्यांच्या मंदिरात विराजमान झाले. प्रतिष्ठापनेच्या दिवशी महाराष्ट्राला, तुम्हा प्रेक्षकांना हा सोहळा दाखवण्याचं भाग्य मला लाभलं होतं...अयोध्येत हजर राहता आलं होतं. या पावन दिवसाने दिलेला आनंद आणि समाधान माझ्यासाठी आयुष्यभर सकारात्मक ऊर्जेचं काम करेल. सध्या राममंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचं आणि परकोट्याचं काम सुरु आहे. आज बुलेटिन संपवताना राममंदिराची ताजी दृष्यं तुम्हा प्रेक्षकांसाठी