Kankavali News : कणकवलीत मोठा अनर्थ टळला, इमारतीवरील मोठं लोखंडी शेड पडलं | Marathi Newsकणकवली शहरामध्ये वादळी वाऱ्यामुळे नरडवे फाटा नजीक सुरू असलेल्या एका बिल्डिंगवरील लोखंडी छप्पर तब्बल तीनशे मीटर अंतरावर उडून कणकवली कनेडी नरडावे रस्त्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर गेटवर जाऊन पडले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही... तालुक्यात आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ झाले. या वादळात कणकवली नरडवे फाटा नजीक काम सुरू असलेल्या एका बिल्डिंग वरील लोखंडी छप्पर तब्बल बिल्डिंग वरून साधारणपणे तीनशे मीटर अंतरावर उडून कणकवली कनेडी नरडावे रस्त्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर गेटवर जाऊन पडले. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.