Marathwada Jarange started a movement the pickle of reservation spread all over the country. which spread to Mumbai and the whole politics was stirred that land before the assembly elections, it was said that the air of Jarange would make smoke in the whole of Marathwada. but in time the Jarange retreatedमराठवाडा....जरांगेंनी आंदोलन सुरु केलं...आरक्षणाचं लोण देशभर पसरलं...ज्याची धग मुंबईलाही लागली...अन् अख्खं राजकारण ढवळून निघालं...ती भूमी.. विधानसभा निवडणुकीआधी जरांगेंची हवा अख्ख्या मराठवाड्यात धुमाकूळ घालेल असं बोललं जात होतं...पण ऐनवेळी जरांगेंनी माघार घेतली...आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपला सगळा फोकस मराठवाड्याकडे केला...विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर 60 हून अधिक सभा घेणार आहेत...पण त्यातील तब्बल 25 हून अधिक सभा फक्त मराठवाड्यात असणार आहे...जरांगेंची माघार, त्यानंतर शिंदेंचा मराठवाड्यात सभांचा धडाका याचा परस्पर काय संबंध असू शकतो..? आणि मराठवाडा शिवसेनेसाठी इतका महत्त्वाचा का, हेच मी तुम्हाला या व्हिडीओत सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा...