मराठवाडा आणि नैसर्गिक आपत्ती हे जणू समीकरणे आहेत. दुष्काळ, आवर्षण, अतिवृष्टी अशा वेगवेगळ्या संकटांनी मराठवाड्याची जनता नेहमीच त्रासलेली असते. मागील वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यावर तीव्र पाणीटंचाईचे सावट आहे. जालना जिल्ह्यातील एकूण 64 प्रकल्पांपैकी केवळ एकाच प्रकल्पात 19 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर जिल्ह्यात केवळ 0.78 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती भीषण होऊ शकते.