जालन्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. जालन्यात दोन गटात लाठी, काठ्या आणि तलवारीनं तुबंळ हाणामरी झाली. या घटनेत तलवारीचे वार झाल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. व्यंकटेश तुकाराम गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव आहे. शहरातील शास्त्री मोहल्ला परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतलं असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.