जीवनात आपल्या पाठीशी आपल्या आई-वडिलांची साथ असेल तर आपण पुढे वाटचाल करण्यास नेहमीच प्रोत्साहित राहत असतो. अशातच मध्येच आई-वडिलांची साथ सुटली, तर बरेच जण आयुष्यात तुटून जातात. मात्र कोल्हापुरातील एक तरुण आई वडिलांच्या निधनानंतर अगदी कमी वयातच वाट्याला आलेले दुःख बाजूला सारत स्वतःच्या पायावर उभारण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे. आई-वडिलांच्या छत्राविना जगत असतानाच तो स्वतःची एक छोटेखानी नर्सरी चालवत आहे. मात्र विशेष म्हणजे व्यवसाय करत असताना स्वतःचे शिक्षणही त्याने थांबू दिलेले नाही.