वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण…आणि मुंबईचा वडापाव म्हणजे देश-विदेशातील खव्वयांसाठी पर्वणी. तुम्ही आजवर मुंबईत किंवा मुंबईबाहेर वेगवेगळ्या ठिकाणच्या वडापावची चव चाखली असेल. काही वडापाव भारी लागले असतील, काही वडापाव लय…भारी लागले असतील. पण तुम्ही कधी इडली वडापाव खाल्लाय का? असा वडापावपण असतो? पडला ना प्रश्न? होय, हा पदार्थ चवीला एकदम Yummy लागतो आणि तो तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं बनवू शकता.