रंगांचा सण म्हणजे होळी. हा रंगांचा सण लोक एकत्र साजरा करतात. यावेळी एकमेकांना रंग लावले जातात. मात्र, होळीच्या रंगांमध्ये अनेक हानिकारक रसायने असतात. ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते. त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. यासाठी केमिकलयुक्त रंगांपासून आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी? विशेषतः धुलीवंदनाच्या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? यासंदर्भात वर्धा येथील आयुर्वेदाचार्या- सौंदर्य तज्ज्ञ डॉ. प्रीती राऊत यांनी माहिती दिली आहे.