प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. कुणाला चित्र काढण्याचा तर कोणाला कविता लेखनाचा छंद असतो. आणि प्रत्येक जण आवड जपण्याचा प्रयत्न हा करत असतो. असाच एक छंद छत्रपती संभाजीनगर शहरातील सुनील उबाळे यांना देखील आहे. त्यांना कविता लिखाणाचा छंद आहे. आणि त्यांच्या घरावरती सर्वत्र कवींची नावही काढलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घराला कवितांचे घर म्हणून ओळखले जाते.