खेलेंगे रंग.. साई के संग, असा जयघोष करत हजारो साईभक्तांनी शिर्डीत रंगपंचमी साजरी केली. शिर्डीकरांसोबतच देशभरातून आलेल्या साईभक्तांनी रंगांची उधळण करत साई मंदिर परिसरात रंगपंचमीचा आनंद लुटला.