होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात रंगांची उधळण केल्या जाते. मात्र, हे रंग नैसर्गिक नाहीतर केमिकल युक्त असल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मनोरुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या यवतमाळ येथील नंददीप फाऊंडेशनने पळसाच्या फुलांपासून रंग बनविण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे स्वतः मनोरुग्ण या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. मनोरुग्ण स्वतः पळसाची फुले तोडून आणून त्यावर रंग बनविण्याची प्रक्रिया करत आहेत. आणि कचऱ्यातून प्लास्टिक बॉटल्स उचलून आणून त्यातच रंग भरून विक्री केला जाणार असून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहेत.