शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून ओळखलं जातं. यवतमाळमधील दोघी शेतकरी महिला जीवनदात्याही झाल्या आहेत. विशेष म्हणजे डॉक्टरांनी त्यांना ‘ब्रेन डेड’ घोषीत केलं. मात्र, त्यांच्यामुळे इतर चौघांना नवजीवन मिळालं आहे. कळंब तालुक्यातील मुसळी येथील 30 वर्षीय मनीषा कोकांडे आणि वणी तालुक्यातील सेलूच्या 43 वर्षीय सुधा गुहे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी देहदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या याच निर्णयामुळे मृत्यूनंतरही मनीषा आणि सुधा या अयवरुपानं जिवंत राहणार आहेत.