एखाद्या पैलवानाला पाहिलं की आपल्याला प्रश्न पडतो की ते नेमक काय खात असतील? केळी, दूध आणि अंडी हा त्यांचा सर्वसाधारण आहार सर्वांना माहिती असतोच. पण या व्यतिरिक्त महत्वाचं काय असेल तर ती थंडाईच असते. पैलवानांचं एनर्जी ड्रिंक मानली जाणारी थंडाई शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीर थंड राहण्यास मदत होते. पुण्यात पैलवान नेताजी जाधव यांची ‘पैलवान थंडाई’ प्रसिद्ध असून ती पिण्यासाठी नेहमीच गर्दी असते.