Gulabrao Patil On Rahul Gandhi : 'आम्ही सिझनेबल पुढारी नाही...' पाटलांची गांधींवर टीकागुलाबराव पाटील यांनी राहुल गांधी यांच्या कथित पंढरपूर दौऱ्यावर मार्मिक शेरेबाजी केली आहे. आम्ही सिझनेबल पुढारी नाही, त्यांना विठ्ठलाला काहीतरी मागायचं असेल. आम्ही मात्र देवाने दिले तरी येतो आणि नाही दिले तरी येतो, असा टोला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पंढरपूर दौऱ्याबाबत लगावला. मी गेले 31 वर्षे अखंड वारी करीत असून आम्हाला देवाजवळ काही मागायचे नसते, असे सांगितले . लोकसभेचे निकाल हे असे का आले, हे सगळ्यांना माहित असून ही फक्त सूज आहे, जी येत्या विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा टोला विरोधकांना लगावला.